अमरावती :
महाबोधी सोसायटी द्वारा संचालित आनंदी विद्या मंदिर उच्च प्राथमिक या शाळेमध्ये पहिल्यांदाच कराटे प्रशिक्षण घेत आहे अमरावती येते न्यू हनुमान नगर येथील आनंदी विद्या मंदिर उच्च प्राथमिक शाळा मध्ये पहिल्यांदाच मुला मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देत आहे जिल्यातील कराटे सांस्कृतिक रुजून तरुणांमध्ये आत्मरक्षण व नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी कराटे प्रशिक्षण आवश्यक आहे आजच्या घडामोडी मध्ये मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे ते प्रमाण रोखण्यासाठी मुलींना स्वतःचं संरक्षण करणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांना कराटेचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे अशाच एका शाळेमध्ये आनंदी विद्या मंदिर शाळेमध्ये कराटे ट्रेनिंग देत आहे त्यामध्ये त्यांना स्वतःचं संरक्षण करणे व तलवारबाजी, नान चाकू लाठीकाठी अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षण देत आहे या उपक्रमासाठी शाळेची मुख्याध्यपका शीतल नवले यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभलेले आहे व मुख्य कराटे प्रशिक्षक सचिन मून ब्लॅक बेल्ट 3rd दान व मास्टर प्रियांशी गवई, क्रिष्टी गवई तसेच शाळेची शिक्षिक विशाल गवई सह शिक्षक, रश्मी मुदगल सह शिक्षका , वंदना घोगरे सह शिक्षिका , नितेश धुरंधर सह शिक्षक , लीना थेटे सह शिक्षिका , वृषाली सावरकर सह शिक्षिका , सीमाताई टारपे शिपाई ,या सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी गण यांनी सहकार्य केले व या कराटे प्रशिक्षण ला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..