अमरावती : महिला व बालकल्याण सुरक्षा समिती, अमरावती यांची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 19 मार्च 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता संस्थापक अध्यक्ष सौ. जया दिलीपराव बद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.
बैठकीत अमरावती जिल्हा, शहर तसेच तालुका स्तरावर नवीन सभासद नोंदणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासाठी पुढील नियोजन म्हणून येत्या 21 एप्रिल 2026 रोजी सर्किट हाऊस, कॅम्प रोड, अमरावती येथे विशेष बैठक घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

या बैठकीस संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये अध्यक्ष जया बद्रे, कोषाध्यक्ष रोमिना मंटेरो, उपाध्यक्ष नीता तिवारी, सहसचिव स्वाती काळे तसेच सदस्य प्रतिभा स्वर्ग, सीता काळे, गायत्री वाकोडे, ज्योती बेले, उषा पेंदाम, छायाताई किटुकले आणि सोनूताई यांचा समावेश होता.
बैठकीत संस्थेच्या विस्तारासाठी आणि महिला व बालकल्याणाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी पुढील धोरणांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
















