धामणगांव रेल्वे .
येथील से .फ .ला . हायस्कूलचे शिक्षक सुप्रसिद्ध कवी व गझलकार श्री . गुलाब दौ. मेश्राम यांच्या गझलेची निवड दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आली आहे. आयोजकांनी पत्राद्वारे त्यांचे अभिनंदन करून त्यांना आमंत्रित केले आहे .
दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिल्ली येथिल तालकटोरा मैदानावर होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री सन्मा.नरेन्द्र मोदी यांचे हस्ते होणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष साहित्यप्रेमी सन्मा.शरद पवारसाहेब आहेत .
गुलाब मेश्राम यांच्या कविता व गझलांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे . मराठीसोबतच हिंदी व इंग्रजी कवितेवर सुद्धा त्यांचे प्रभुत्व आहे . त्यांच्या गझला अनेक वर्तमान पत्रे , नियतकालीके , मासिके व वार्षिकांकामधे प्रकाशित झालेल्या आहेत . अनेक कवी संम्मेलने व मराठी गझल मुशायऱ्यामधे त्यांनी श्रोत्यांची भक्कम दाद मिळवली आहे . या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .