अखिल नटराजम् आंतरसांस्कृतिक संघाच्या राष्ट्रीय नृत्यस्पर्धेत धामणगाव रेल्वेच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अखिल नटराजम् आंतरसंस्कृतिक संघ, नागपूर (CID – इंटरनॅशनल डान्स कौन्सिल, पॅरिस – फ्रान्सचे सदस्य) यांच्या वतीने आयोजित ऑल इंडिया २०वी कल्चरल नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अँड फेस्टिव्हल – “नृत्य दर्पण” ही भव्य राष्ट्रीय नृत्यस्पर्धा दि. २८ ते ३१ डिसेंबर २०२५या कालावधीत पुणे, महाराष्ट्र येथे संपन्न झाली.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सप्तरंग कथ्थक अकॅडमी व स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थिनी उर्वी मंगेश राजनकर व सावी सतीश राठोड यांनी ज्युनिअर वयोगटातील समूह नृत्य प्रकारात भारतीय शास्त्रीय कथ्थक नृत्य सादर केले.

देशभरातून सहभागी झालेल्या सुमारे ३०० शास्त्रीय नृत्य सादरीकरणांमधून उर्वी राजंनकर व सावी राठोड यांनी आपल्या उत्कृष्ट, तालबद्ध व भावपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर तृतीय पारितोषिक पटकावले. त्यांच्या शास्त्रीय शुद्धतेने युक्त सादरीकरणाने परीक्षकांची विशेष प्रशंसा मिळवली.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी* यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पालक व शिक्षकानी ही या यशाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थिनींचे कौतुक केले.

या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून इतर विद्यार्थ्यांनाही शास्त्रीय कला क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

veer nayak

Google Ad