भीम जयंती निमित्त जातीय सलोख्याचे दर्शन
मंगरूळ दस्तगीर:-येथून जवळ असलेल्या जळगाव या गावांमध्ये आगळीवेगळी भीम जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी भीम जयंतीला काही विशिष्ट लोकच दिसत होते परंतु गावातील ज्येष्ठ नागरिक गावकरी तसेच गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी घराघरात भीम जयंती साजरी करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी गावातील बंडू भोयर, स्नेहल वानखडे, विलास भाऊ धनवीज, महेश भाऊ खडसे, अजय राव समरित , सुरेंद्र सरोदे (हनुमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष)कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन भीम जयंती हा उत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करण्याचे ठरवले.
भीम जयंती ची रॅली गावातून निघण्या अगोदर प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या मिरवणूक रॅली गावात फिरत असताना गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुदेव सेवा मंडळ व हनुमान मंदिर यांच्यावतीने रॅलीचे स्वागत तसेच अल्पोपहाराची व्यवस्था गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना स्थळाजवळ करण्यात आली होती.
त्याचबरोबर ग्रामपंचायत समोरील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सुद्धा भीमसैनिकांनी केले. ह्या मिरवणुकीमध्ये जातीय सलोखा राखण्याचे काम गावकऱ्यांनी केले.
निवडणुकीच्या तोंडावर गावामध्ये राजकारण करून जातीय सलोखा बिघडवणाऱ्या काही राजकीय लोकांना ही चांगली चपराक गावकऱ्यांनी हाणल्याची चर्चा गावात सुरू होती.
भीम जयंती च्या या सार्वजनिक सोहळ्यात बंडू भोयर, विलास भाऊ धनवीज स्नेहल वानखडे,अजय समरीत, महेश भाऊ खडसे,ग्रामपंचायत सदस्य विजयराव वानखडे, सुरेंद्र सरोदे (हनुमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष) पोलीस पाटील सुरेंद्र खुरसळे, सौरभ बावनगडे, रामेश्वर सरोदे, संदीप निर्मळ, प्रदीप राव गोपाळ, योगेश वानखडे, मनीष देवतारे, सागर इंगोले, सुरेशराव तडस, प्रमोद सावरबंदे ,प्रमोद चोपडे, अनिल निर्मळ ,प्रकाश इंगोले, लीलाधर वानखडे ,राजेंद्र चौधरी, संदीप हजारे ,उदय वैद्य ,मनोज चौधरी प्रकाश दुर्वे, प्रफुल्ल निर्मळ, सविता ताई धनवीज, सुषमाताई बानगडे ,रोशनी ताई थोरात अश्विनीताई वानखडे, शितलताई वानखडे, पंचशीलाबाई वानखडे कांताबाई वानखडे, जमुनाताई धनवीज, मीनाक्षीताई गायकवाड उज्वला ताई देवतारे, मीनाक्षीताई सरोदे, मीनाक्षीताई चौधरी ज्योतीताई चौधरी, सारिका ताई खरसडे ,अनिताताई निर्मळ ,प्रज्ञाताई वानखडे ज्योतीताई गोपाळ, शोभाताई गोपाळ ,सोनू ताई इंगोले योगिताताई चौधरी, रजनीताई चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.