माऊलींच्या आगमनाने जुना धामणगाव भक्तीरसात न्हाऊन निघाला

0
48
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव प्रतिनिधी:

श्री संत सद्गुरु माऊली वसंत बाबाजी यांच्या आगमनानिमित्त जुना धामणगाव नगरीत आयोजित कार्यक्रम भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या आगमनानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी माऊलींचे आगमन जुना धामणगाव येथे झाले. या प्रसंगी काल्याच्या निमंत्रण पत्रिका वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हरिपाठ व सत्संगाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडला. हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमला. वातावरणात अध्यात्मिक आनंदाची लहर निर्माण झाली.

कार्यक्रमात संतवाणी, हरिपाठ, आणि सत्संग प्रवचनांद्वारे समाजात आध्यात्मिकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रध्देने कीर्तन ऐकत ‘माऊलींचा जयघोष’ करत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महिला-पुरुष, युवक-युवती, लहान मुले सर्वांनीच या भक्तिमय सोहळ्यात सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाचे आयोजन संत सद्गुरु मोतीराम बाबा विचार मंच, जुना धामणगाव तसेच समस्त गुरुबंधू-भगिनी, जुना धामणगाव व शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. आयोजकांनी उपस्थित सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले.

veer nayak

Google Ad