आदर्श महाविद्यालय, धामणगांवरेल्वे येथे ७ वा महाविद्यालयस्तरीय दीक्षांत समारंभात ३५२ विद्यार्थ्यांना केली पदवी प्रदान

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचा ४१ वा दीक्षांत समारोह नुकताच पार पडला. या कार्यक्रमानंतर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी पदवी वितरण समारंभाचे आयोजन करावयाचे होते. विद्यापीठ नियमावलीनुसार दि. २२ मार्च, २०२५ रोजी आदर्श विज्ञान, जयरामदास भागचंद कला व बिरला वाणिज्य महाविद्यालय, धामणगांव रेल्वे. येथे ७वा महाविद्यालय स्तरीय “पदवी वितरण” सोहळा अत्यंत थाटात पार पडला.

यावेळी महाविद्यालयातून ३५२ विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली तर विशेष कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. रमेशचंद्रजी चांडक तसेच सहसचिव डॉ. असितजी पसारी, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.सुधीर बायस्कर, विज्ञानशाखा प्रमुख डॉ. सुर्यकांत रोडगे, कलाशाखा प्रमुख डॉ.दीपक शृंगारे, वाणिज्यशाखा प्रमुख डॉ. आनंद नरांजे व समन्वयक डॉ. सौरभ घोगरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विविध विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विध्यार्थी व त्यांचे पालक या सोहळ्यास उपस्थित होते.
पदवी वितरण समारंभामध्ये उपस्थित पदवी धारक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी चे वितरण करण्यात आले. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयातील एकूण ८ विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळाले व २ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल ने विद्यापीठाकडून गौरवण्यात आले. या प्रसंगी पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागातील ३१, पदव्युत्तर वाणिज्य विभागातील ०८, पदव्युत्तर गणित विभागातील ३०, पदव्युत्तर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील २१, पदव्युत्तर इलेक्ट्रॉनिक्स विभागातील १६, पदव्युत्तर संगणकशास्त्र विभागातील ०६, पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागातील ०८, पदवी कला विभागातील ४५, पदवी वाणिज्य विभागातील ७५, पदवी विज्ञान विभागातील ९५ व पदवी कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विभागातील १७ असे एकूण ३५२ विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली आहे. मान्यवरांच्या हस्ते सर्वांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले. प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ॲड. रमेशचंद्रजी चांडक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्व व पटवून दिले व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य. डॉ. सुधीर बायस्कर यांनी विद्यार्थ्यांना चांगले भवितव्य घडविण्यासाठी मेहनत व चिकाटीने काम करण्याचा संदेश दिला व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी शिक्षक व सर्व घटकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.जितेंद्र बारूळकर व प्रा.प्रणाली वाकेकर यांनी केले व आभार प्रा.जितेंद्र सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सांस्कृतिक समितीने विशेष परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad