शेतकऱ्याना कोऱ्या चेक ची मागणी करणाऱ्या बँके व्यवस्थापकवर होणार कारवाई. आ प्रताप अडसड यांच्या मागणीवर पालकमंत्र्या चे निर्देश सततधार पावसामुळे पिकाच्या नुकसानाचे होणार सर्वेक्षण जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगावं रेल्वे

शेतकऱ्यांचे कामाचे दिवस असताना पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना विशेषतः सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून पाच कोरे चेक मागितले जातात या बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर कारवाई चे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले जिल्हा नियोजन समितीत रविवारी आ प्रताप अडसड यांनी शेतकऱ्याचा कर्जाच्या प्रकरणाचा विषय मांडला

शेतकऱ्यांना विविध अनुदान शासनाच्या मार्फत देण्यात येते मात्र बँकेकडून अडवणूक केले जात आहे अनेक दिवस पीक कर्जाच्या फाईल बँकेत पडून राहतात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही बँक शाखा व्यवस्थापक मुद्दामपणे या कर्ज फाईल अडकून ठेवतात विशेष म्हणजे अमरावती आरसिसी कडे पाठवून अनेक दिवस कर्ज प्रकरणाची फाईल पडून राहते या विषयावर आ अडसड यांनी लक्ष वेधले

सतत पावसामुळे होणाऱ्या पीक नुकसानाचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी,३०५४-५०५४ लेखा शीर्षक पिसीआय इंडेक्स अंतर्गत कामे न घेता लोकप्रतिनिधी सुचविलेली कामे घ्यावी, भिल्ली येथे शेळीच्या गोठ्याला लागलेल्या आगीत जगदेव काळमेघ यांच्या ३८ शेळ्या जळून मृत झाल्या होत्या शेळी मेंढी विकास महामंडळाकडून शेळी मेंढी देण्यात यावी ,देवगाव साखर कारखान्या साठी शेतकऱ्यांची घेतलेली जमीन परत करण्यात यावी येथील शेतकऱ्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशा मागण्या आ प्रताप अडसड यांनी जिल्हा नियोजन समितीत केली यावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सर्व मागणी मंजूर करीत राज्य स्तरावर साखर पुढील आठवड्यात

साखर कारखान्या साठी शेतकऱ्यांची घेतलेली जमीन परत करण्यासाठीं बैठक घेण्यात येईल भिल्ली येथील पशू पालकांना शेळी मेंढी देण्यात येईल सतत पावसामुळे होणाऱ्या पिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश आ प्रताप अडसड यांच्या मागणीवरून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले

veer nayak

Google Ad