आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : येथील दि. 25/09/2025 ला भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान विसापूर जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित केली होती. या सहली मधे 44 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता . चंद्रपूरला जाते वेळी बाबा आमटे यांच्या आनंदवन वरोरा येथे भेट दिली तेथे बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या विविध विभागाला भेट दिली तेथे कृष्ठ रोगी अंध व अपंग यांच्या मदतीने विविध साहित्य कशा प्रकारे तयार केली जातात तसेच अंध व अपंग व्यक्ती सोबत विद्यार्थांनी व शिक्षकांनी संवाद साधून माहिती जाणून घेतली . अंध अपंग व्यक्तीचा स्वरानंद ऑर्केस्ट्रा चां सर्वांनी आनंद घेतला, त्यानंतर वनस्पती उद्यान विसापूर येथे जाऊन प्रकल्प अधिकारी श्री सचिन उमरे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी रोज उद्यान ,बटरफ्लाय उद्यान , ॲनिमल म्युझियम , फिश ऍक्वारिअम, सायन्स सेंटर,औषधी वनस्पती, फॉसिल वनस्पती आणि प्राण्यांच्या, तसेच विविध प्राणी, प्राणी अवशेष . मानवी शरीरात ज्या विविध प्रक्रिया चालतात त्या कशा प्रकारे कार्य करतात या बद्दल विस्तृत व उपयुक्त माहिती दिली तसेच जैवविविधता या बद्दल सुद्धा माहिती जाणून घेतली . एकदिवसीय शैक्षणिक सहली करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के यांच्या परवानगीने आयोजित करण्यात आली होती. या सहली मधे प्रा. डॉ. विजया मुळे, प्रा. डॉ. अनिल दहाट , प्रा. डॉ. विनय हिवसे, प्रा.डॉ. मंजुषा भोयर, प्रा. मनोहर कोल्हे, प्रा. डॉ. पवन ठाकरे,व प्रा. जयेश पांडे यांनी सहभाग घेतला होता.















