मंगरूळ दस्तगीर (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती):
स्वर्गीय रतनलालजी भुतडा स्मृतीपित्यर्थ आयोजित भव्य शंकर पट बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन आज वर्धा लोकसभेचे खासदार अमरजी काळे व धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
उद्घाटन सोहळ्यावेळी परिसरातील तसेच जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधव, बैलगाडा शर्यतीचे शौकीन आणि नागरिक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. पारंपारिक पोशाखात सजलेले बैल आणि शेकडो गाड्यांची उपस्थिती पाहून परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

या शर्यतीचे आयोजन काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समिती बांधकाम सभापती व मंगरूळ दस्तगीर सोसायटीचे अध्यक्ष रवी भुतडा यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

या प्रसंगी विविध मान्यवरांनी पारंपारिक खेळ जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले व शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम केला.
खासदार अमरजी काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदायाचा उत्साह आणि पारंपारिक संस्कृतीचे दर्शन दुर्मीळ आहे. ही शर्यत शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि त्यांच्या बैलप्रेमाशी जोडलेली परंपरा आहे.”
आमदार प्रताप अडसड यांनीही आयोजकांचे अभिनंदन करत या उपक्रमामुळे ग्रामीण संस्कृतीला नवे बळ मिळत असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमात राजू धारवाले (नगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष), पंकज देशमुख, अनुप महल्ले, मनोज शिंदे, राजू सोनी, शेषराव तिजारे, राजूभाऊ डाफ, राहुल ठाकरे, दिलीप झुवारे, पंकज काळे, संतोष मंडलिक, विठ्ठल चव्हाण, पंकज खंडारे, बालू दारवेकर, बालू ठाकूरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.














