श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा यांचे द्वारा शिदोडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये शिबिरार्थी द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर.

0
27
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे वार्ताहर) 

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा यांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर “युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी” या थीम द्वारे दिनांक ७/१/२०२५ ते १३/१/२०२५ दरम्यान दत्तक ग्राम शिदोडी, तालुका धामणगाव रेल्वे येथे संपन्न झाले. यामध्ये शिबिरार्थी द्वारा गावकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नुकताच शिबिरार्थींनी ग्रामस्थांचे मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सर्व शिबिरार्थी व गावातील प्राथमिक शाळेतील मुलांनी एकत्रपणे नृत्य, नाटक, मिमिक्री व एक पात्री प्रयोग सादर करून गावकऱ्यांचे मनोरंजन केले. 

सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी शिदोडी गावच्या सरपंच सौ करिष्मा ताई शिवरकर, श्री उमेश शिवरकर, उपसरपंच रितेशजी निस्ताने, पोलीस पाटील सौ संजीवनी ताई निस्तान ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदू शेठ चव्हाण, सर्व स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दीपक बोंद्रे, प्रा पवन शिवणकर, श्री प्रमोद नागपुरे, श्री सुहास आप्तुरकर, व सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad