शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वी अमरावती जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२४-२५ चा समारोपीय समारंभ व बक्षीस वितरण सोहळा शनिवारी दि. ११/०१/२०२५ ला धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन सी.बी.एस इ. स्कूलमध्ये संपन्न झाला.जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण १००वैज्ञानिक प्रतिकृतीसह विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता. दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी सहा परीक्षकांनी प्राथमिक गट,माध्यमिक गट , आदिवासी गट ,दिव्यांग गट ,तसेच प्राथमिक शिक्षक गट ,माध्यमिक शिक्षक गट व प्रयोगशाळा परिचर याचे पारदर्शक मूल्यमापन केले. समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. शोभादेवी राठी यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व माता सरस्वती व संस्थापक संस्थापक श्री नारायणजी अग्रवाल, सर सी.व्ही. रमण तसेच रामानुजन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.विशेष अतिथी मा. श्री किरण सरनाईक सदस्य विधान परिषद म.रा. अमरावती शिक्षक मतदार संघ, मा. श्रीमती नीलिमा ताई टाके,शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग, श्रीमती प्रिया देशमुख शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.अम., तसेच प्रमुख उपस्थिती धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.ॲड.श्री रमेशचंद्रजी चांडक, सचिव ॲड.आशिषजी राठी, सहसचिव डॉ. असीतजी पसारी, विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ.रवींद्रजी भास्कर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. प्रवीण दिवे, शिक्षण उपनिरीक्षक श्री.अतुल वानखेडे, विद्यानिकेतन सी.बी. एस. सी.स्कूलचे प्राचार्य श्री.रवी देशमुख यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता देशपांडे मॅडम यांनी सर सी.वी.रामन, रामानुजन ,होमी भाभा,ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखेच विद्यार्थ्यांमध्ये दडलेले विविध वैज्ञानिक यामधून तयार व्हावे कोरोना सारख्या महामारीच्या संकटावर विज्ञानामुळेच आपण मात करू शकलो म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा या प्रदर्शनीचा उद्देशअसतो हे स्पष्ट केले. त्यानंतर श्रीमती प्रियाताई देशमुख शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग अमरावती श्रीमती प्रियाताई देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते.असे मत व्यक्त केले. शिक्षण अमरावतीच्या नीलिमाताई टाके यांनी गरज ही शोधाची जननी आहे आणि आपण विज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात कसा उपयोग करू शकतो हे स्पष्ट केले. विधान परिषद म.रा.अमरावती शिक्षक मतदार संघाचे सदस्य श्री किरणजी सरनाईक यांनी ग्रामीण भागातून बालवैज्ञानिक निर्माण होतात. वैज्ञानिक सुनीता विल्यम, विजय भटकर या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना ब क्षीस वितरण करण्यात आले. प्राथमिक गटातून अंजनगाव सुर्जी येथील ज्ञानपीठ इंग्लिश शाळेच्या जीकर मेनन या विद्यार्थिनीला मातीविना शेती या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. ज्ञानमाता हायस्कूल अमरावती येथील नित्या हेडाऊ हिच्या मशरूम कल्टिवेशन टेक्नॉलॉजीला द्वितीय तर धामणगाव येथील विद्यानिकेतन सी.बी.एस.इ स्कूल च्या श्रीराम वराडे यांच्या स्मार्ट फार्मिंग प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला. अपंग गटात वरुड तालुक्यातील वघाळ येथील दर्शन मानकर, आदिवासी गटात वस्तापुर येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी मयूर खडके प्रथम, माध्यमिक विभागात भाग्यश्री माध्यमिक विभाग अमरावती येथील वल्लभ कदम प्रथम वरुड येथील न्यू ऑरेंज सिटीची काशी साचेकर द्वितीय धामणगाव येथील से.फ.ला. हायस्कूल मधील सर्वज्ञ मालधूरे याने तृतीय क्रमांक पटकावला. प्राथमिक शिक्षक गटात श्री किशोर परतेकी प्रथम तर माध्यमिक गटात शुभांगी हेडाऊ प्रथम क्रमांक पटकाविला. यशवंत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात त्यानंतर अध्यक्षीय भाषणात शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. शोभादेवी राठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना *प्रयत्नांती* *परमेश्वर* विद्यार्थ्यानी प्रयत्न केले तर अशक्य कल्पना ही प्रयत्नांनी साकारल्या जातात असे मत व्यक्त केले. संचलन सौ सुचिता लंगरे यांनी तर आभार प्रदर्शन अतुल वानखडे शिक्षण उपनिरीक्षक जिल्हा परिषद अमरावती यांनी केले . आभार प्रदर्शनात श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाच्या संपूर्ण टीम, एन.सी.सी व गाईडच्या स्वयंसेविका विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी बजावली ,विद्यानिकेतन सी.बी.एस.इ.स्कूलचे संचालक श्री .जोशी सर व प्राचार्य श्री. देशमुख सर यांचे सहकार्य लाभले.