आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : येथे सिद्धार्थ बुद्ध विहार, आंबेडकर नगर स्त्री उद्धारक सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षा ज्योतीताई भिमके होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शारदाताई वसंतराव पाटील मुख्याध्यापिका नूतन कन्या विद्यालय (तळेगाव शा. पंत) तसेच वर्षाताई मानकर, करुणाताई दाभाडे, विदिशा ताई ठाकरे या सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून होत्या. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना मनवर यांनी केले प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. शारदा वं पाटील मॅडम यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहे त्याचे उच्चाटन कसे करावे याची माहिती दिली शिक्षित लोकांनी वाईट जोडी परंपराचे उच्चाटन करून नवीन रूढी परंपरा कायम कराव्यात याची माहिती दिली. तसेच वर्षाकर वर्षाताई मानकर यांनी वर्षावासाचे महत्त्व सांगितले करुणा दाभाडे यांनी सुद्धा सावित्रीबाईच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पद्माताई सवाई यांनी केले यावेळी कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.