चांदूर रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम. पत्रकार दिनी रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन.

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे प्रतिनिधी :-

  अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ ,अमरावती आणि चांदुर रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र तसेच गोवा राज्यात ‘ पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, या दोन्ही महत्त्वपूर्ण बाबींचे औचित्य साधून ६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळ वाटप करत रुग्णांना ग्रामीण रुग्णालयातील तज्ञ डाक्टर यांच्या वतीने आरोग्यविषयक मार्गदर्शन पत्रकार संघ तर्फे सर्व रुग्णांना उत्तम आरोग्यासाठी मंगलमय शुभेच्छा देऊन हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. तालुका मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमात चांदुर रेल्वे शहरातील तसेच तालुक्यातील सामाजिक , राजकीय तसेच सेवाभावी वृत्ती जोपसणाऱ्या सर्व व्यक्तींनी आवर्जून उपस्थित राहावे असे नम्र आवाहन संघटनेचे अध्यक्ष गुड्डू उर्फ प्रवीण शर्मा, उपाध्यक्ष मंगेश बोबडे, सचिव बंडू आठवले, शहराध्यक्ष राजेश सराफी, शहर उपाध्यक्ष अभिजीत तिवारी तसेच संघटनेचे पदाधिकारी अमोल अमोल ठाकरे, प्रा. सुधीर तायडे, हरीश ढोबळे, प्रमोद इंगळे मनोज गवई ,सुभाष कोटेचा ,दिनेश जगताप व अतुल उज्जैनकर यांनी केले.

veer nayak

Google Ad