आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी विधानसभा क्षेत्रात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना अमरावती नागपूर गाठावे लागते त्यामुळे लोकांच्या भावनेचा विचार करून व आर्वी परिसरातील नागरिकांना चांगल्या सोयी सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी आर्वीत अत्याधुनिक आय हॉस्पिटल डॉक्टर रोहित टेकचद मोटवानी यांनी सुरू केले ..त्या आय हॉस्पिटलचे आज उद्घाटन करताना मला आनंद होतो.. त्यातून रुग्णाच्या सेवा सुविधा उपलब्ध होतीलच पण अनेकांचे आशीर्वाद हेही महत्त्वाचे ठरतात हे लक्षात घ्यावे असे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी केले .
साईनगर येथे आय हॉस्पिटलचे उद्घाटन प्रसंगी खासदार अमर काळे आज दुपारी दोन वाजता बोलत होते
ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपूरचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर रविशंकर धकाते प्रमुख अतिथी होते.
आजकाल डॉक्टर झाल्यावर प्रत्येक जण मोठ्या शहरात जाऊन पैसा कमवण्यासाठी विचार करतात मात्र येथील या डॉक्टरने मोठ्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आणि चेन्नई येथे संकरा नेत्रालय येथे प्रॅक्टिस केली डॉक्टर रोहित मोटवानी यांनी विचार केला असता तर त्यांनी नागपूर अमरावती किंवा अन्य मोठ्या ठिकाणी दवाखाना टाकला असता परंतु असे न करता आपण समाजासाठी काही केले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी शहरातच रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अतिशय चांगला आहे याचे सर्वांनी कौतुक केले पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर धकाते यांनी केले.
नागपूर येथील हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश सोनकुसरे नेत्र रोग तज्ञ डॉक्टर सीमा लेले रोटरी क्लब गांधी सिटी चे माजी अध्यक्ष श्री निवास लेले जय दादा बेलखडे बाळा जगताप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष मेघराज डोंगरे ज्येष्ठ नागरिक घनश्यामदास लालवानी सुदामा मोटवानी टेकचंद मोटवानी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रमुख अतिथींनी आपले विचार प्रकट करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रोहित मोटवानी यांनी केले. संचालन एडवोकेट दीपक मोटवानी यांनी केले तर आभार रमेश मंशानी यांनी मानले