आव्हान-2024 मध्ये श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा सहभाग.

0
18
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)
डॉग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचलित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या 10 स्वयंसेवकांची व बजाज कृषी महाविद्यालय पिंपरी, वर्धा येथील दहा स्वयंसेवकांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला द्वारे आव्हान 2024 चान्सलर्स ब्रिगेड या संकल्पनेतून आधारित आपत्ती व्यवस्थापन दहा दिवसीय शिबिरामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे सहभागी झाले होते. कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी विद्यार्थी सक्षम असला पाहिजे यादृष्टीने या शिबिरामध्ये विविध प्रशिक्षण देण्यात आले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील एन. डी. आर. एफ. च्या वतीने 35 मार्गदर्शक नियुक्त करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना आग,पुर व इतर नैसर्गिक आपत्ती बाबत प्रशिक्षण देण्यात आले. दहा दिवसांमध्ये उद्घाटन व समारोपीय कार्यक्रमाव्यतिरिक्त रक्तस्त्राव थांबविणे, जखमेची काळजी घेणे, आपत्ती व्यवस्थापनाच्या प्राथमिक संकल्पना, आपत्तीपूर्व तयारी, बेसिक लाईफ सपोर्ट, सर्पदंश,प्राणी दंश प्रथमोपचार, वादळ, ढगफुटी, विजांचा कडकडाट, उष्माघात प्रकरण,यातील मदत, स्नायू व हाडांची दुखापत रुग्णांची काळजी व स्थलांतरण, आग, वनवा, भूकंप, भूस्खलन, यापासून बचाव करणे. पुराची कारणे, व आपली व इतरांची काळजी घेणे, सुनामी, रासायनिक आपदा, जैविक आपदा, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर आपदा, आदी विषयावर स्वयंसेवकांना तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यापीठाद्वारे कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ राणी मोरे,बजाज कृषी महाविद्यालय, वर्धा यांनी मोलाची जबाबदारी पूर्ण केली. आव्हान-2024 मध्ये सहभागी स्वयंसेवकांना विद्यार्थी कल्याण अधिकारी, डॉ संदीप हाडोळे, डॉ. मंजुषा देशमुख महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. नंदूशेठ चव्हाण, सर्व व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री राजूभाऊ भोगे, प्राचार्य सौ. वृषाली देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. दीपक बोंद्रे, प्रा पवन शिवणकर, श्री प्रमोद नागपुरे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी यांच्या अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad