चांदूर रेल्वे
वंचितबaहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी धामणगाव रेल्वे मतदार संघातील तमाम नागरिकांचे आभार मानले आहे. २३ तारखेला कोण बाजी मारणार या कडे संपूर्ण मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
डॉ. निलेश विश्वकर्मा यांना मतदार संघात मतदारांनी दिलेले प्रेम व भरभरून केलेले मतदान या मुळे तमाम जनतेचे आभार मानले. धामणगाव रेल्वे मतदार संघातील चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावात प्रचारा दरम्यान भारघोष असा प्रतिसाद दिला. डॉ.निलेश विश्वकर्मा व काँग्रेस, भाजप यांच्यात तिहेरी लढती निर्माण झाले आहे. येत्या २३ तारखेला मत मोजणी होणार असून कोण बाजी मारतो या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धामणगाव रेल्वे मतदार संघात तिहेरी लढतीचे चित्र निर्माण झाल्याने सट्टे बाजीलाही चांगलेच चित्र निर्माण झाले आहे. विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडेल. याची चौका चौकात चर्चा सुरु आहे. मागील निवडणुकीत घेतलेली मते आणि या वेळी डॉ निलेश विश्वकर्मा यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढल्याने उलट सुलट चर्चे लाही उधान आले आहे.