धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा विभागीय तर्फे आयोजित तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये वुशू (मिक्स मार्शल आर्ट) ही स्पर्धा जिल्हास्तरीय क्रीडा संकुल अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी देवांशू भारत सोनकुसळे (वर्ग 10 वा ) याने वयोगट 17 व 56 किलो वजन गटामध्ये याने प्रथम क्रमांक पटकविला तसेच विभागीय स्तराकरिता नियुक्ती झाल्यामुळे नंतर ६ ऑक्टोबर 2024 रोजी विभागीय स्पर्धा आयोजित क्रीडा संकुल अमरावती येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये त्याने द्वितीय क्रमांक पटकवून विभागीय स्तरावर आपल्या शाळेचे नाव व आपल्या तालुक्याचे नाव उंचाविले आहे. या विद्यार्थ्याला विद्यालयाचे शारीरिक शिक्षक व खेळाचे मार्गदर्शक श्री सौरभ पांडेय सर व श्री शोगन धांदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हे स्थान मिळवले आहे.
या यश प्राप्त विद्यार्थ्याला विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे,उपप्राचार्य प्रा.प्रदीप मानकर, पर्यवेक्षक अनिल लाहोटी व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे..