अमरावती, दि.17 ‘रामायण’ महाकाव्याचे रचनाकार महाकवी महर्षि वाल्मिकी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
महसूल भवनात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.