कापुराचा वास उठन चौथाई, अवधूत गर्जना होते नामावरी झेंडे चढविण्याचा चित्त थरारक नेत्रदीप कार्यक्रम श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे “दसरा-यात्रा महोत्सव” संपन्न झेंडे चढविण्याचा चित्त थरारक नेत्रदीप कार्यक्रम हजारो भाविकांची उपस्थिती

0
29
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे :- महाराष्ट्रातील विदर्भात प्रसिद्ध लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक १२/१०/२०२३ शनीवारला दुपारी १२.०० वाजता संस्थानच्या वतीने संस्थानमध्ये “चंदन- उटीचा- कार्यक्रम” आणि दुपारी ४.०० वाजता “दसरा” निमित्त महाराजांचे “झेंडे चढविण्याचा” चित्त थरारक नेत्रदीप असा कार्यक्रम कापुराच्या अखंड ज्योतीने आणि भजनाच्या गजरात संस्थानचे विश्वस्त मंडळ आणि असंख्य भाविकांचे उपस्थितीत संपन्न झाला.

संस्थानचे विश्वस्त चरणदास नामदेवराव कांडलकर रा. सावंगा (विठोबा) हे नवीन वस्त्र परिधान करून यांचे शुभ हस्ते महाराजांच्या बोहलीची विधीवत पूजन तसेच दोन्ही झेंड्याची पूजा करून नवीन खोळ(कापड) घालण्याकरिता या दोन्ही झेंड्याला पायाचा स्पर्श न लागू देता दोरांच्या सहाय्याने झेंडे चढविण्याच्या कार्यक्रम विश्वस्त मंडळाचे उपस्थितीत झाला.

          बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता संस्थानचे अन्नदान समितीच्या वतीने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच या मांडीमध्ये बाहेर गावावरून भजनासाठी येणारे अवधूत भजन मंडळाकरीता दैनंदिन भोजन,नास्ता आणि चहा इ. व्यवस्था करण्यात आली होती.

          तरी हजारोच्या संख्येने सर्व भाविक- भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला, तसेच यात्रेत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने स्वयंशिस्त दिसून आली,

दरवर्षी प्रमाणे संस्थानमध्ये दैनंदिन सकाळी ५.०० ते ७.०० या कालावधीत “काकडा कार्यक्रम” सुरू होत आहे,तरी या कार्यक्रमात समस्त गावकरी मंडळी आणि भाविक भक्तांनी सहभागी व्हावे,सर्व भाविक- भक्तांनी नित्य नियमाने सुरु असलेल्या संस्थान च्या विविध कार्यक्रमाकरिता तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, दिगांबर राठोड, अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

veer nayak

Google Ad