अर्थशास्त्र विभाग आदर्श महाविद्यालयाची म.गांधी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला भेट केळकर राजमलाई, लोणचे, बोरकुट लघु उद्योगांना भेटी

0
56
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :

स्थानिक धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श महाविद्यालय येथील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक शैक्षणिक सहल नुकतीच पार पडली. धामणगाव येथून सुरू झालेली सहल वर्धा जिल्ह्यातील दहेगाव येथील केळकर लोणचे, भारतीय कुटीर उद्योगाची राजमलाई, बोरकुट इंडस्ट्री अशा लघुउद्योगांना भेट देत पुढे निघाली. नंतर वर्धा येथील महात्मा गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थान येथील वेगवेगळ्या विभागांना विद्यार्थ्यांनी भेट दिली व उद्योग कसा सुरू होऊ शकतो, उद्योगाला लागणारा कच्चा माल, उद्योगाकरता प्रशिक्षण अशा अनेक बाबींवर येथे मार्गदर्शन प्राप्त झाले. नंतर मगन संग्रहालय, गीताई मंदिर, विश्वशांती स्तूप, जापनीज बौद्ध विहार, व शेवटी पवणार अशा अनेक संस्थांना भेटी देऊन यशस्वीरित्या संपन्न झाली. या औद्योगिक सहलीचे आयोजन अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिपक शृंगारे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बायस्कर यांच्या मार्गदर्शनात केले.

 

सहली दरम्यान अर्थशास्त्र विभागातील प्रा. विलास नागोसे, प्रा. विशाल मोकाशे, प्रा. समीक्षा वानखेडे उपस्थित होते. बीए भाग तीन व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागातील 40 विद्यार्थी या सहलीत सहभागी होते. सहलीच्या यशस्वी ते करिता अक्षय मुर्के, मोहम्मद अकिब,आकांक्षा गवारले, सुवर्णा वंजारी, मैथिली वैद्य, रोशनी राठोड, भुमेश्वरी ठोंबरे इत्यादी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad