चांदुर रेल्वे / येणाऱ्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ आल्याने धामणगाव विधानसभा मतदारसंघातील लुप्त झालेल्या काही नेत्यांना पुन्हा जनतेची आठवण झाली आहे, काही नेते वगळता जे नेहमी जनते च्या संपर्कात राहत होते मग ते समाजकार्य असो, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, जनतेच्या कामे करिता प्रशासनाला निवेदने,आंदोलने, उपोषणे, करीत असतात आणि यां ना त्या कारणाने नेहमी मतदार संघातील जनतेच्या समस्यांचे निराकारण करत संपर्कात राहत आहे, या व्यतिरिक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची हुरहुर लागतात मागील चार वर्षापासून भूमिगत झालेले काही नेते सुद्धा निवडणुकीच्या तयारीत लागले आहे, जनतेसोबत संपर्क साधण्याकरिता हे भूमिगत नेते मतदार संघात जनतेला बॅनर पोस्टर च्या माध्यमातून जनतेला विविध सणाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे, तसेच नविन पक्ष कार्यालय उघडून तर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन जनतेसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न करत आहे, जेणेकरून येणारी विधानसभा निवडणूक आपण कशाप्रकारे जिंकू याकरिता अटी तटी चे प्रयत्न करत आहे, अशा भूमिगत झालेल्या नेत्यांना मतदार संघातील जनता थारा देणार का? अशी खमंग चर्चा सध्या धामणगाव रेल्वे मतदारसंघात सुरू आहे,