सदरची परिषद शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती व स्वतंत्र भारत पक्ष ह्यांच्याद्वारे निमंत्रक एड. चेतन परडखे यांचे वतीने आयोजित केलेली होती सदरच्या परिषदेचे सूत्र संचालन अशोकराव हांडे विभागीय अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल भुजडणे केले.
ह्यावेळी संघटनेचे तिन्ही तालुका प्रमुख शरद नेरेकर, सुधाकर थेटे, सुशील कचवे तर तालुका महिला आघाडी अध्यक्ष माधुरीताई पांडे व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते प्रशांत बायस्कर, अनिल निमकर, व दिवाकर राऊत बाबाराव जाधव, सुधाकर थेटे, पुरुषोत्तम मारोडकर, डॉ.सुरेंद्र खेरडे, दिनेश ढवस, अॅड मनोहर देशमुख, नंदकिशोर देशमुख,दिपक शंभरकर, जिभकाटे,प्रशांत बारस्कर,शरद नेरकर उपस्थित होते.