धामणगाव रेल्वे : ६ सप्टेंबर २०२४ – स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी “मॉडेल युनायटेड नेशन्स” आदर्श संयुक्त राष्ट्र परिषद” 4.0 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले , जिथे त्यांनी दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केले. ही कॉन्फरन्स स्कूल ऑफ स्कॉलर्स, वानाडोंगरी, नागपूरला ३१ ऑगस्ट २०२४ आणि १ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती.या परिषदेत विविध शाळांमधील सुमारे सत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते.
मॉडेल युनायटेड नेशन्स (MUN) कॉन्फरन्सचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रांच्या ऑपरेशन्सचे अनुकरण करणे, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, वाटाघाटी आणि समस्या सोडवण्याचा अनुभव प्रदान करणे आहे.
यामध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स धामणगाव चे विद्यार्थी पुष्पक राठोड आणि अर्पित ढवळे यांना “बेस्ट डेलीगेट” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर श्रिया घारफळकर आणि आस्था इंगोले यांना “हाय कमेंडेशन” पुरस्कार मिळाला. त्यांच्या या यशामध्ये त्यांना शिक्षिका सना अफरीन यांचे मार्गदर्शन लाभले आणि प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेतर्फे विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक ,पालक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.