धामणगाव रेल्वे,
हिंदू समुदायावर बांगलादेश येथे तसेच बंगालमध्ये होणारा अन्याय अत्याचार तसेच नुकताच झालेल्या एका महिला डॉक्टर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित अटक व्हावी या मागणी उपस्थित शेकडो लोकांनी जिल्हाधिकारी यांना धामणगावच्या तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केले
हिंदू धर्मातील विविध संघटना तसेच व्यापारी वर्गाच्या सदस्यांनी शुक्रवारी श्री छत्रपती शिवाजी चौक इथून शांतपणे मोटरसायकल रॅली काढून निषेध व्यक्त केला याप्रसंगी धामणगाव शहरातील व्यापाऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की हिंदू समुदाय व हिंदू समुदायाच्या व्यावसायिकांवर तसेच त्यांच्या प्रतिष्ठान वर होत असलेल्या अन्यायाबाबत व कलकत्ता येथील महिला डॉक्टर वर करण्यात आलेल्या अवमाननीय कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच प्रशासनाला या निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते की, बंगालमध्ये व बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला त्वरित आळा घालण्यात यावा
दोशी दोशींवर कठोर कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा निवेदनामध्ये करण्यात आली यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम घोषणा देण्यात आल्यात तहसीलदारांना निवेदन देताना व्यापारी वर्ग व हिंदू समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते