स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा धामणगाव रेल्वे, ९ ऑगस्ट २०२४ 

0
67
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे, ९ ऑगस्ट २०२४

श्री दत्ताजी मेघे बालकल्याण संस्थेद्वारे संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव ९ ऑगस्ट २०२४ रोजी, विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली. विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा पद ग्रहण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची भावना रुजविण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी होत्या. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री गिरीश ताथोड, धामणगाव रेल्वेचे पोलीस निरीक्षक (पी.आय) या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा समारंभ शाळेच्या प्रांगणात सकाळी ९:०० ते १०:३० ते या वेळेत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजनकरून करण्यात आली. प्रमुख पाहुणे व प्राचार्य यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. दिलीप खोब्रागडे सर यांनी करून दिला .श्री. दिलीप सर आणि श्री नितीन जाधव सर यांनी मुलांना शिस्तीच्या मूल्यांबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ स्थापून त्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली. तत्पूर्वी विद्यार्थी प्रतिनिधिंना रिबन आणि बॅजेस देऊन गौरविण्यात आले. विविध मंत्रिमंडळानुसार त्यांना कारभार सोपविण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधिंना आपल्या पद व कार्याची जाणीव करून दिली. स्काऊट, गाईड आणि श्री कोमल सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी हेड बॉय राजवीर शिरभाते, हेड गर्ल शर्वरी तायडे, यांची निवड निवडणूकीद्वारे करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची संकल्पना रुजविण्यासाठी निवडणूक सोहळा घेण्यात आला. शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी परिषदेला शपथ दिली. प्रमुख पाहुणे व प्राचार्यांनी त्यांच्याकडे ध्वज हस्तांतरण केले.

प्रमुख पाहुणे आणि प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांच्या भाषणाने समारंभाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्री शीतल एकोणकर आणि सुश्री सना आफ्रिन यांनी केले. सर्वांचे आभार, इंग्रजी शिक्षिका स्नेहा राजपूत यांनी मानले. आयोजनासाठी दिपाली खरे, सुभाष बोस व प्रभारी दिलीप खोब्रागडे यांच्यासह समाज अभ्यास विभागाचे शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad