कोरोमंडलची रॅक लागली असून त्यामध्ये डीएपी खतावर 14:35:14 लिंकिंग करून घेण्याचे कंपल्सरी केले आहे. त्यामध्ये 400 रुपयांचा फरक आहे तेव्हा गरज नसताना ही प्रक्रिया कंपल्सरी करू नये विदाऊट लिंकिंग करून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून द्या. आमदार प्रतापदादा अडसड यांची विधानसभेत मागणी.
शेतकऱ्यांचे कामाचे दिवस असताना क्रॉप लोन साठी शेतकऱ्यांना विशेषतः सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून क्रॉप लोन देण्याकरिता पाच कोऱ्या चेकची मागणी केल्या जात असून ही मागणी करू नये असे बँकांना निर्देश द्यावे. व ज्या शेतकऱ्यांची खाते होल्ड वर ठेवली आहे त्या शेतकऱ्यांचे खाते होल्ड वर न ठेवता त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या निधीची उपलब्धता त्वरित करून देण्यात यावी.- आमदार प्रतापदादा अडसड
ग्रामीण भागातील यशवंत योजनेच्या फाईल संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन घरकुल योजनेचा लाभ द्यावा.- आमदार प्रतापदादा अडसड
धामणगाव रेल्वे मतदार संघामध्ये जलयुक्त शिवार योजनेची कामे अर्धवट असल्यामुळे नाले फुटून पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या संदर्भात मदत करावी तातडीने पाहणी करून त्या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत करण्यात यावी.- आमदार प्रतापदादा अडसड