संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या १ लक्ष ‘वृक्ष लागवड रोप मोफत वाटप’ उपक्रमाची सुरुवात ५००० झाडे वितरित करून करण्यात आली आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. मनुष्याला भविष्यात स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे, जर हे उपाय योजले नाही, तर भविष्यात मनुष्याला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार आहे.
याकरिता संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री नितीन कदम यांच्या संकल्पनेतून १ लक्ष वृक्ष वितरित करुन वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्याचाप्रमाने बडनेरा शहरी भागातील नागरिकांच्या दारापर्यंत वृक्षवितरित करून संगोपन चाचणी पूर्ण झाल्यानंतर आकर्षक बक्षिसे जिंकण्याचीही सुवर्ण संधी नागरिकांना मिळणार आहे. महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे असे प्रतिपादन नितीन कदम यांनी केले आहे.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरण संवर्धनाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे वृक्ष लागवड चळवळ थंडावली आहे. ती गतिमान करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न केले पाहिजेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना मानवहिताची असून त्यामुळे शुद्ध हवा तसेच पावसाचे प्रमाण वाढणार आहे. म्हणून प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे तरच पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहील. यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असेही नितीन कदम यांनी नमूद केले.
दरवर्षी उन्हाचा प्रकोप वाढत आहे. विशेषतः उन्हाळ्यात सूर्य आग ओकत आहे. आगामी काळातही आणखी उन्हाचे चटके बसण्याची शक्यता आहे. परिणामी, संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्वांनी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. यासाठी युवक युवतींनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच ‘झाडे लावा व झाडे जगवा’ असा संदेश देण्यात आला.सामाजिक संस्थांकडून कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण केले जाते. परंतु त्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारीदेखील सामाजिक संस्थांनी घेतली पाहिजे. वृक्षाचे संवर्धनदेखील केले पाहिजे, असे कदम यांनी सांगितले.सदर उपक्रमांतर्गत वृक्ष घेतलेल्या नागरिकांनी योग्य संगोपन केल्यानंतर तब्बल ११ लक्ष पेक्षा अधिक रकमेचे १५०० रोख बक्षिसे वितरित करण्याची सुवर्ण संधी नागरिकांना मिळणार आहे.यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम,उपाध्यक्ष पर्वेक्ष कदम,अक्षय धुडस,स्वप्नील मालधुरे, निशा कदम, वैष्णवी कदम, सोनाली कदम, मंजू कदम, करुणा कदम, शितल चौधरी, अनिता गेंद, नीलिमा अंजीकर, जया अर्डक, पल्लवी वैद्य, वैशू बडगे, प्रतिभा महाजन, जयश्री वानखडे, ज्योती करपे, मीना कुचे, ठाकरे काकू, लिखितकर काकू, प्रभा गाडे, माधुरी मारोडकर, रत्ना सूर्यवंशी, स्मृति धूडस, नीता सोनवाल, अर्चना सोनवाल, शिल्पा पिकले, ममता ठाणेकर, कल्पना ठाणेकर, नागे ताई, स्मिता देशमुख,वैशाली पोटफोडे, विजू पोटफोडे, सोनाली भाकरे, कांचन गाडे, रसिका कदम, नयना कदम,हर्षिता कावरे व इतर नागरिक उपस्थित होते.