धामणगाव विधानसभा मतदारसंघातील धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यात आमदार प्रतापदादा अडसड यांनी १८८ कोटी रुपयांची ९४० की.मी. अंतराचे पांदन रस्ते मंजूर करून आणले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पांदन रस्त्याची समस्या आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नातून पुर्ण होणार.
जूना धामणगाव येथील ११ पांदन रस्त्याचे भूमिपूजन कीमत २ कोटी २० लक्ष रुपये.
जूना धामणगाव राजधानी नगर ग्राप च्या खुल्या जागेच्या बाजूला नाली व रस्ता बाधकाम साईनगर राऊत यांच्या घरापासून नाल्या पर्यंत नाली बांधकाम २० लक्ष रुपये.
जूना धामणगाव येथील साखरकर यांच्या घरापासून जिवतोडे ते बावनेर यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे आशिष नगर येथील धुर्वे ते चौधरी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम किँमत १७ लक्ष रुपये.
राजधानी नगर सावंत यांच्या घरापासून ते मुडे तसेच दबले ते बाबा ठाकूर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे किमत २० लक्ष रुपये.
धामणगाव पुष्कर नगर येथील वैद्य ते अजमीरे घरापर्यंत सिमेंट रस्ता किंमत १० लक्ष रुपये.
धामणगाव येथील महेश बमनोटे यांच्या घरापासून ते डबले सिमेंट रस्ता बांधकाम करणे ७ लक्ष रुपये.
या विकास कामांचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते आज भूमिपुजन संपन्न झाले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी होते.