आज दि.९-जुन-२०२४ रविवारला मंगरुळ दस्त.येथील धम्मसागर बौद्ध विहारात “दर रविवारी चला बुद्ध विहारी ” हा कार्यक्रम भा.बौद्ध महासभा (शाखा धाम.रेल्वे) व जन्मभूमी ग्रृप द्वारे आयोजित करण्यात आला.बुद्धविहार कमिटी व रमाई महिलामंडळाच्या सर्व सदस्यांच्या अथक परिश्रमाने व समन्वयाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या आदर्शांच्या प्रतिमेला अभिवादन करुन वंदना घेण्यात आली. नंतर ध्यानसराव आणि मा.मेढे साहेब यांनी अतिशय सुंदरप्रकारे उदा.सह चार आर्यसत्ये या विषयावर प्रबोधन केले.
भा.बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर गीतगायन केले.
आणि या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार भा.बौद्ध महासभेद्वारे करण्यात आला. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात प्रत्येकाला फोटो प्रतिमा देवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थी खालीलप्रमाणे
वर्ग १० वा
१) अर्पित गुल्हाणे ९५%
२) कु.माही काळबांडे ९४%
३) सम्यक मांदळे ९२%
४) कु.पौर्णिमा ९१%
५) कु.आरुषी बुटले ९०%
६) कु.तनश्री बुटले ८८%
७) कु.सुप्रिया नि.टाले ८८%
८) आर्यन काळबांडे ८६%
९) तन्मय देवगळे ८३%
१०) आदित्य टाक ८०%
११) शंतनू वाघ ७७%
१२) दिशांत भील ७५%
वर्ग १२ वा
१) कु.आरती निचत ८५%
२) श्रेयश मांदळे
३) बुद्धभूषण बन्सोड
या कार्यक्रमाला मंगरुळ दस्त.गावचे सरपंच मा.सतीशभाऊ हजारे , बुद्धविहार कमिटीचे अध्यक्ष-मा.राजेंद्रजी बन्सोड, सचिव- मा.राजेश खोब्रागडे, प्रमुख उपस्थिती-
मा.डाॕ.सत्यशील टेंम्पे
मा.विश्वनाथजी प्रभे सर,
मा.मिलिंद बन्सोड,
मा.जगनराव बन्सोड
तसेच भा.बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष- मा.विजयराव लोखंडे ,महासचिव -विशालभाऊ सुटे, सोबतच मा.गोटे साहेब, मा.रुपचंदजी गुजर,मा.घरडे साहेब,मा.शालीकराम कवाडे,केंद्रिय शिक्षिका आणि इतर सर्व कार्यकर्ते सोबतच विहार कमिटीचे सदस्य , रमाई महिलामंडळाच्या सदस्या- वंदनाताई बन्सोड ,रिनाताई बन्सोड ,शालुबाई मांदळे, लक्ष्मीबाई खडसे,सुशिलाबाई कावळे आणि भा.बौद्ध महासभेचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मा.जयमालाताई लोखंडे यांनी तर आभारप्रदर्शन मा.डाॕ.सत्यशिल टेंम्पे यांनी पार पाडल. या कार्यक्रमाला मा.राजेशजी बन्सोड, आणि युवा कार्यकर्ते यांचे विशेष योगदान लाभले.