धामणगांव रेल्वे शहारातील कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकरी बंधुला सुविधे करीता ओळखली जाते. तालुक्यातील शेतक-यांना गावातच शेतमालाची विक्री व योग्य भाव देण्याबाबत समिती
तत्पर आहे. या आधी तिळ खरेदी सुरु करण्यात आली होती. तिळ खरेदीला मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे व शेतकरी बंधुंना गावातच योग्य भाव मिळत आहे. तिळ खरेदी नंतर आज दि.२५/०५/२०२४ समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारावर ज्वारी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभाला आडते संतोष राजनकर च्या आडत मध्ये नागापुर येथील सेतकरी
श्री अरुण भिमरावजी गाडेकर यांच्या ज्वारीला २३११ रुपये भाव मिळाला. श्री गिरीषभाऊ भुतडा, श्री लंकुश दुर्गेकार, श्री सचिन राठी, श्री राधेश्याम चांडक व श्री मनिष भटटड यांच्या खरेदी मध्ये शुभारंभ झाला. प्रथम शेतकरी श्री अरुण भिमरावजी गाडेकर यांचा शुभारंभ प्रसंगी समितीचे निरीक्षक श्री दिनेश दादारावजी गोमासे यांच्या हस्ते शेतकरी बंधु ला शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला समितीचे आडते श्री रितेश राठी, श्री दिपक राजनकर, श्री भालेराव, श्री अशोक कांकरीया, श्री राजेन्द्र पनपालिया, व्यापारी श्री सचिन मुंधडा, श्री मनिष केला, श्री कैलास राठी, श्री नंदलाल राठी, श्री मुकेश पनपालिया, श्री रुपेश वानखडे, श्री निलु पनपालिया, श्री देवराव कापसे, श्री संतोष लाहोटी, श्री आनंद कांकरीया तसेच समितीचे कर्मचारी यार्ड प्रमुख श्री प्रमुख श संजय तुपसुंदरे, समितीचे कर्मचारी राजु तायडे, श दिलीप पाटील, भुषण जुमडे, कविश मेटे, रामेश्वर वानखडे कर्मचारी सोबत शेतकरी, आडते, व्यापारी हमाल बंधु कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी शेतकरी मनोगत व्यक्त करताना
समिती व्दारे तिळ, ज्वारी,सोयबिन् तुर चना भुईमुंग खरेदी सुरु केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बंधुना गावतच योग्य भाव मिळत असुन चांगल्या सुविधा समितीने उपलब्ध करुन दिल्या बददल संचालक मंडळ व महीला सभापती सौ कविताताई श्रीकांतभाऊ गावंडे व समितिचे सचिव प्रवीण वानखड़े व प्रशासनाचे कौतुक करुन आभार मानले.