राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी (मंगरूळ ता. धामणगाव रेल्वे) सामाजिक न्याय विभाग अंतर्गत मंगरूळ दस्तगीर येथील राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | । युट्युब
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक न्याय विभाग बार्टी अंतर्गत सौ सरोज आवारे ,ठाणेदार गौतम इंगळे (मंगरूळ दस्तगीर ) डॉ. टेंपे व प्रमुख पाहुणे म्हणून सुजाता गायकवाड उपस्थित होत्या . राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोचे सर्वप्रथम पूजन करण्यात आले व मान्यवराचे स्वागत घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या समतादूत सौ सरोज आवारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ही धुरा सांभाळणे गरजेचे आहे तसेच ठाणेदार गौतम इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवीत असताना आपल्या समाजाचा विकास कसा होईल याचा विचार करणे गरजेचे आहे तसेच डॉ टेंपे यांनी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर अतिशय सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तसेच सुजाता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आलेल्या अडचणी व त्यावर मात करून स्वतःला कसे घडवायचे असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल फडके यांनी केले तसेच कार्यक्रमाला उपस्थित ठाणेदार गौतम इंगळे, समतादूत सौ सरोज आवारे, डॉ टेंपे, सुजाता गायकवाड समतादूत तसेच विद्यार्थी वर्ग