धमाणगाव रेल्वे
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच 26 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमर काळे यांच्या निवडणूक मोर्चे बांधणी ला सुरुवात झाली असली तरीही धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकीमुळे विविध चर्चांना उत आलेला आहे दरम्यान ह्या प्राथमिक बैठका असून लवकरच एकत्रित मेळावा होणार असल्याचे तीनही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे.
धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पसारी धर्मशाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक महावीर भवन तर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना शहरप्रमुख नाना देऊळकर यांच्या घरी आयोजित करण्यात आली आहे.
एकंदरीत तीन पक्षांची ही मोट प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले नामदार अनिल देशमुख कशी बांधतात आणि या माध्यमातून विजयश्री कशी खेचून आणतात? हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी तीन स्वतंत्र बैठका हा परिसरातील संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला असून काँग्रेस पक्षाची रोज सुरू असलेली पदाधिकाऱ्यांची गळती राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांचे एकत्रित नियोजन या सर्वांवर कशा पद्धतीने मात केले जाते यावरच पुढील राजकीय गणित अवलंबून असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे