देशाचे नेते केंद्रीय मंत्री माननीय श्री.नितीनजी गडकरी यांनी आज नागपुर येथील न्यूईरा हॉस्पिटल येथे वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष भाजपा नेते मा.श्री.अरूणभाऊ अडसड यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली व जनसंघ ते भाजपा या कार्यकाळातील जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. यावेळी श्री.अजयजी संचेती, श्री.संजयजी भेंडे, मा.आ.श्री.गिरीषजी गांधी, जेष्ठ पत्रकार मा.श्री.बाळासाहेब कुलकर्णी यांनी सुद्धा भेट घेतली. यावेळी भाऊंनी माननीय श्री.नितीनजी यांना लोकसभेच्या निवडणुकी करिता हार्दिक शुभेच्छा दिल्या व विजयाचे अग्रिम अभिनंदन केले.