धामणगाव रेल्वे
मतदार संघातील पापळ जन्मगाव असलेले देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव बेलोरा विमानतळाला द्यावे त्यांच्या जन्म गावी उपलब्ध असलेल्या जागेवर कृषी शासकीय महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी विधानसभेत आमदार प्रतापदादा अडसड यांनी केली दरम्यान शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्याचा मुद्दा त्यांनी विधानसभेत मांडला
मुंबई येथील सुरू असलेल्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की
महाराष्ट्रातील युती सरकारने अतिशय चांगला अर्थसंकल्प मांडला आहे, सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे त्याबद्दल त्यांनी सरकारचे कौतुक केले
शेतकऱ्यांना जुनी कर्जमाफी तात्काळ व्हावी याकरीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कर्जमाफी झाली होती आणि नवी कर्जमाफी सुद्धा झाली होती पण यां दोन्ही कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी वंचित राहिले त्यांना लवकरात लवकर कर्जमाफी देण्याची मागणी त्यानी केली. बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव द्यावे तसेच त्यांच्या जन्म गावी कृषी शासकीय महाविद्यालय व्हावे.
पांदन रस्ता हा शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यांना त्याच रस्त्यावरून येजा- करावी लागते, या पांदण रस्त्या मार्गावरील पावसाळ्यात पुलांचे मोठया प्रमाणात नुकसान होते तरी धडक मोहीम राबवून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा शासनाने शासकीय मोजणी करून पांदन रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा
आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटलांच्या रास्त मागण्यांचा विचार व्हावा अशी मागणी आ प्रतापदादा अडसड यांनी विधानसभेत केली