मान. रणजितसिंहजी देओल प्रधान सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) महाराष्ट्र राज्य यांची पीएम श्री गांधी विद्यालयास भेट

0
18
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी,प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

 आर्वी : स्थानिक नगर परिषद पीएम श्री गांधी विद्यालय आर्वी येथे दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंग जी देओल यांनी भेट दिली आणि समूह शाळे च्या प्रकल्पाबाबत चर्चा केली.

सर्वप्रथम एनसीसी पायलट आणि छात्र सैनिक यांनी सन्मानाने प्रधान सचिव यांना मानवंदना दिली विद्यार्थिनींनी स्वागत केले. मा. परागजी सोमण मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद वर्धा यांनी शाल ,श्रीफळ ,सुतमाळ आणि चरखा देऊन माननीय प्रधान सचिव यांचे स्वागत केले तसेच सन्माननीय डॉ. किरणजी सुकलवाड ,मुख्याधिकारी नगरपरिषद आर्वी व प्राचार्य श्री व्हि . टी.पायले यांनी शाल ग्रामगीता ,भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय परागजी सोमन यांचे स्वागत केले. तसेच उपस्थित शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग डॉक्टर माधुरी सावरकर यांचे मान. डॉक्टर मंगेश घोगरे, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा यांनी स्वागत केले तसेच डॉक्टर मंगेश घोगरे सर, माननीय डॉक्टर जयश्री घारफळकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद वर्धा यांचा सत्कार प्राचार्य श्री. पायले सर यांनी केला तसेच माननीय महेंद्र गजभिये शिक्षणधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा, माननीय बोराडे सर उपअभियंता समग्र शिक्षा एम पी एस पी मुंबई, माननीय गटशिक्षणाधिकारी पंकज जी तायडे पंचायत समिती आर्वी, माननीय बोराडे मॅडम ,श्री सिद्धेश वाडेकर कार्यक्रम अधिकारी एमपीएसपी मुंबई यांचा सुद्धा विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

गांधी विद्यालय ही खूप जुनी शाळा असून या शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग आहेत. शाळेविषयी च्या समस्या माननीय प्राचार्य तसेच मुख्याधिकारी साहेब यांनी माननीय प्रधान सचिव यांना सांगितल्या. मा.रणजीत सिंग जी देओल प्रधान सचिव यांनी शालेय परिसराची पाहणी केली वर्ग दहावीतील विद्यार्थ्यांची हितगुज केली

तसेच गांधी विद्यालय मधील सर्वात जुनी असलेले एनसीसी युनिट वरील ऑफिसला सुद्धा भेट दिली आणि जे उपक्रम यांची अंतर्गत सुरू असतात त्याचे सुद्धा माहिती एन सी सी अधिकारी प्रमोद नागरे यांच्या कडून घेतली आणि कौतुक केले. परंतु सन्माननीय प्रधान सचिव आणि इतर अधिकारी यांच्या संकल्पनेतून वर्ग एक ते बारावीचे एक समूह शाळा असावी ज्या शाळा तीन किलोमीटरच्या परिघात आहे आणि त्यांचे पटसंख्या कमी आहे त्या सर्व शाळांचे एकत्रीकरण करण्याचे या भेटीचा उद्देश होता भविष्यामध्ये समूह शाळेची सुरुवात ही आर्वीतील पीएमश्री नगरपरिषद शाळेतून होईल यासाठी आज हे सर्व अधिकारी एकत्र आले होते आणि त्यांनी सर्वांना मार्गदर्शक सूचना दिल्या याप्रसंगी वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक नगर परिषद गांधी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad