आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश महासचिव अनंत मोहाेड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसच्या ठरवलेल्या यादी प्रमाणे काँग्रेस विचार धारेवर चालणारे इच्छुक उमेदवार तयार करण्यात आले होते. परंतु अनंत मोहोड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच संघटन हे तयार होऊ नये म्हणून काही पूर्व काँग्रेसच्याच नेत्यांनी नातेसंबंधाचा फायदा घेत कोणत्याही स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पाठीमागून सुरा खोपून अगदी वेळेवर ही युती स्थापन केल्याचे असे दिसून येत आहे.
मात्र नुकत्याच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या बाळा जगताप यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाकरिता जिल्हाध्यक्षाने एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल केला असे नगरपरिषद कार्यालयासमोर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे यांनी मीडियासमोर सांगितले.
परंतु ही युती धोक्याने केलेली असून अशा बिन बुडाच्या युतीला आम्ही मान्य करत नाही असे त्याच क्षणी नगरपरिषद कार्यालय येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत येऊन अनंत मोहोड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महासचिव) व शैलेश अग्रवाल (राष्ट्रीय समन्वयक सदस्य) यांनी स्पष्ट केले.
अनंत मोहाेड यांच्या नेतृत्वात आर्वी शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं एक नवीन वटवृक्ष तयार होत असल्याने पूर्व काँग्रेस नेत्यांच्या आर्वी शहरात काँग्रेस वाढत दिसत असल्याने कुठेतरी पूर्व काँग्रेस नेत्यांच्या पोटात दुखणं सुरू झाल्याचे दिसत आहे. अनंत मोहोड हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी असून इतर काही पूर्व काँग्रेस पक्षाच्या लोकांना ते खूपत असल्याने असे कटकारस्थान करून कदाचित हा डाव रचल्याचे अशी आर्वी शहरात जोरदार चर्चा होत आहे.
————————————–
पक्षाने ठरवलेल्या यादी प्रमाणे नगराध्यक्ष पदाकरिता बाळा जगताप यांच्या पत्नीचे कुठेही नाव नव्हते व उभे असलेल्या काँग्रेस पक्षावर या चार नगरसेवक पदाचे सुद्धा नाव नव्हते मग हे नाव आले कुठून आणि यांना एबी फॉर्म दिले कोणी हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. माझ्या नेतृत्वावर काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवून सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पूर्व काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी हा डाव रचल्याचे दिसत आहे. परंतु अशा जिल्हाध्यक्षाच्या नापरवाहीमुळे या नगरपरिषद निवडणुकीमध्ये उभे केलेले उमेदवार या निवडणुकीच्या प्रक्रियेतून वंचित राहिले.या घडलेल्या प्रकरणाची जाणीव ठेवून सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व मी स्वतः जाऊन जिल्हाध्यक्षाची सदर तक्रार मा. राजेंद्र मुळक जिल्हाप्रभारी तसेच प्रदेश अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांचेकडे केलेली आहे.
अनंत दादा मोहोड
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (प्रदेश महासचिव)













