वीर नायक न्यूज – स्पेशल रिपोर्ट

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे शहराच्या चौफेर विकासाला गती देऊ – भाजप उमेदवार डॉ. अर्चना अडसड-रोठे यांची खास मुलाखत!

धामणगाव रेल्वे :

धामणगाव रेल्वे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. अर्चना अरुणभाऊ अडसड-रोठे (आक्का) यांनी वीर नायक न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले.

️ मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या—

“धामणगाव रेल्वेचा पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा आम्ही तयार केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि युवकांसाठी रोजगार प्रत्येक क्षेत्रात आम्ही मोठे बदल घडवणार आहोत.”

त्यांनी पुढे सांगितले—

“केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन देणार, याची हमी आम्ही देतो.”

शहरातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

“आधुनिक आणि सुरक्षित धामणगाव घडवण्यासाठी नागरिकांनी भाजपाच्या उमेदवाराला विश्वासाने साथ द्यावी,” अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली.

veer nayak

Google Ad