पहिल्या दिवशी फक्त१५:५० क्विं सोयाबीनची खरेदी,
एकाच शेतकऱ्याने विक्रीसाठी आणले सोयाबीनचे माल,
चांदुर रेल्वे / शासनाच्या वतीने नाफेडच्या मार्फत ता १७ पासून सोयाबीन खरेदी ची सुरुवात करण्यात आली,मात्र शासनाच्या जटिल अटी किंवा शेतकऱ्या जवळ विक्रीसाठी सोयाबीन शिल्लक नसल्या कारणाने खरेदीच्या पहिल्या दिवशी एका शेतकऱ्याने नाफेड मार्फत आपल्या सोयाबीनची विक्री केली,यावेळी फक्त १५:५० क्विं सोयाबीन या शेतकऱ्याने विक्रीसाठी आणले होते,मात्र या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने ५९०क्विं सोयाबीनची विक्री झाली आहे,तर याच हंगामात शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत जवळपास ३१ हजार क्वि सोयाबीनची विक्री केल्याचे समजते,त्यामुळे असं दिसून येते की शहर व तालुक्यातील शेतकरी हे नाफेडच्या मार्फत सोयाबीन चा भाव जास्त येत असून सुद्धा त्याकडे न जाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल विक्रीकरिता आणत असल्याचे दिसून येते
नाफेडच्या वतीने सोयाबीन विक्री नोंदणी ची सुरुवात ०१ नोव्हें पासून करण्यात आली होती,पहिल्याच दिवशी १४८४ फॉर्म यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने आले होते,तर 17 नोव्हें पर्यंत फक्त १८८ शेतकऱ्यांची बायोमेट्रिक नोंदणी झाली होती, तर ७६५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती आता पर्यंत एकूण ९५३ शेतकऱ्यांची बायोमेट्रिक नोंदणी झाली आहे, त्यामुळे नाफेडच्या मार्फत माल खरेदी करण्याकरिता २० शेतकऱ्यांना ता १७ रोजी बोलवण्यात आले होते मात्र फक्त एका शेतकऱ्यांनी १५:५० क्विं माल नाफेड ला विकण्या करिता आणले होते,तर या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने ५९० क्विंटल माल विक्रीकरिता आणला,
नाफेड च्या मार्फत खरेदी करण्यात आलेल्या मालाचे पैसे शासनाच्या वतीने आठ ते दहा दिवसात देण्यात येते, मात्र हेच माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांना विकल्यास भाव जरी कमी भेटत असेल तरी व्यापारी शेतकऱ्यांना नगदी पैसे देतात, म्हणूनच रब्बी हंगामातील गहू, हरभरा,भुईमुंग सारखे पिक पुढील पीक घेण्याकरिता हेच पैसे शेतकऱ्यांना कामी पडते, म्हणूनच शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत आपले पिकं व्यापाऱ्यांना विकण्या करिता दिसून येते
मार्फत शेतकऱ्यांना सोयाबीनचे भाव ५३२८ ₹ देण्यात येत आहे, मात्र शासनाच्या वतीने काही जटिल अटी सुद्धा यावेळी लावण्यात येते,जसे सोयाबीन ओलावा १२ टक्के च्या आत असावा,तो माती मिश्रित नसावा, सोयाबीन काळा नसावा त्याच्यात खडे नसावे,अशा अटीमुळे,भाव जास्त भेटत असले तरी शेतकरी नाफेड कडे जात नसल्याचे काही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले, तर या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जवळपास ३१ हजार क्विं सोयाबीनचे माल विक्री केल्याचे सुद्धा समजते











