राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त प्रेरणादायी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन

0
50
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, १९ नोव्हेंबर २०२५ — अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आर्वी नगर आणि आर. व्ही. परणकर अभियांत्रिकी महाविद्यालय, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने “वीरांगनेची परंपरा – आजच्या पिढीसाठी मार्गदर्शन” या विषयावर राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात आर्वी शहराचे पोलिस उप निरीक्षक श्री. संतोष चौहान सर यांनी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यपरंपरेचा आजच्या युवा पिढीवर कसा सकारात्मक प्रभाव पडू शकतो, यावर विशेष प्रकाश टाकला.

सोबतच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे संचालक डॉ. रवींद्र परणकर, प्रा. प्रिती परणकर (सचिव, श्री साई परणकर संस्था), अनिरुद्ध ढोरे (अभाविप आर्वी नगरमंत्री) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी हर्ष वानखडे (अभाविप आर्वी नगर विद्यार्थी विस्तारक), अनुराग पावडे (आर्वी नगर सहमंत्री), आनंद जगताप (आर्वी नगर महाविद्यालय प्रमुख), वेदांत कचवे (जिल्हा गतिविधि प्रमुख) तसेच महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

veer nayak

Google Ad