स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थ्यांचा बेबराज कम्प्युटेशनल थिंकिंग चॅलेंज मध्ये उत्स्फूर्त सहभाग

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दिनांक : १६ नोव्हेंबर २०२५

स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘बेबराज इंडिया कम्प्युटेशनल थिंकिंग चॅलेंज’ ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा ०३ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

परीक्षा संगणक तास तसेच सहशालेय उपक्रमांच्या वेळेत उत्कृष्ट नियोजनानुसार घेण्यात आली. विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता तसेच संगणकीय विचारशक्ती विकसित करण्यासाठी या परीक्षेचे विशेष महत्त्व आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांकडून प्रश्नसंच सोडविण्यात आले होते, ज्यामुळे त्यांना प्रश्नांच्या प्रकाराची स्पष्ट ओळख झाली व तयारी अधिक सुलभ झाली.

या चॅलेंजमध्ये १००% विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उल्लेखनीय उत्साह, शिस्त आणि सकारात्मकता प्रदर्शित केली.

या उपक्रमाचे सर्वांगीण मार्गदर्शन प्रशासकीय अधिकारी श्री. प्रीतेश जनवाडे यांनी केले.
शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचीती धर्माधिकारी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यात आली.
परीक्षा प्रमुख संगणक शिक्षिका स्नेहल राऊत, श्री धीरज चाफले आणि श्री. प्रशिक चतूर यांनी परीक्षेचे नियोजन, आयोजन व पर्यवेक्षण अत्यंत काटेकोरपणे पार पाडून परीक्षा यशस्वीरित्या घेण्यात आली.

शाळेत वेळोवेळी अशा विविध स्पर्धा व परीक्षा आयोजित केल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला आणि आत्मविश्वास वाढीस महत्वाची चालना मिळते.

विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सहभागाबद्दल, शिस्तीबद्दल आणि उत्साहाबद्दल शाळा परिवाराने त्यांच्या मनःपूर्वक अभिनंदन केले.

veer nayak

Google Ad