एनसीसी छात्र सैनिकांनी केला पक्षी सप्ताह साजरा

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

75 विद्यार्थ्यांनी सायकलिंग करून सारंगपुरी तलाव येथे पक्षी निरीक्षणात घेतला सहभाग

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सायकलिंग करून सारंगपुरी तलाव येथे ७५ विद्यार्थ्यांनी सायकलिंग करून स्वतः घेतला पक्षी निरीक्षणात सहभाग नोव्हेंबरचा पहिला आठवडा महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो, जो ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत येतो. या सप्ताहाचे आयोजन प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त (१२ नोव्हेंबर) आणि ज्येष्ठ पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त (५ नोव्हेंबर) केले जाते. या आठवड्याचा उद्देश पक्ष्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे हा आहे.
उद्देश: पक्षी आणि जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणे. पक्षी संरक्षणासाठी लोकांचा सहभाग वाढवणे.

यासाठीच दिनांक 7 नोव्हेंबर सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत गांधी विद्यालय येथील एनसीसी छात्र सैनिक यांनी सायकलिंग करत असालंपुरी तलाव या ठिकाणी पक्षी निरीक्षण करतात उपक्रम राबविला जवळपास 75 छात्र सैनिक यामध्ये सहभागी झाले होते .प्राणी मित्र मनीष ठाकरे त्यांचे सहकारी संतोष बोरवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या परिसरामधील आढळणाऱ्या सर्व पक्षांची माहिती सांगितली तसेच पक्षी या सजीव सृष्टीसाठी काय आवश्यक आहे हे सुद्धा समजून सांगितले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी तलाव परिसरामध्ये फेरफटका मारला या उपक्रमांत एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

veer nayak

Google Ad