सत्ताधारी व तुल्यबळ पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी टिकिटीचा कोणाच्या पदरी पडणार राज योग

0
189
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

सत्ताधारी पक्षामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या पैकी २ तर तुल्यबळ पक्षामध्ये माजी नगराध्यक्षाच्या सुनेचे नाव चर्चेत

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रोस्टर जाहीर झाल्या तेव्हापासून सत्ताधारी व तुल्यबळ पक्षात नगराध्यक्ष पदासाठी अनेक उत्सुक उमेदवारांनी प्रवेश केला मात्र तिकीट कोणाला? आर्वी शहराला सशक्त नेतृत्व करणारा उमेदवार मिळणार का? हे देखील आर्वीकरांचे लक्ष लागलेले आहे.

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत केले स्पष्ट

दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली असून २४६ नगर परिषद व ४२ नगरपंचायत निवडणूक जाहीर तसेच ७ नोव्हेंबर ला निवडणूक यादी घोषित होणार नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर तर नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ तर नामनिर्देशन पत्राची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ आणी अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५ व अपील असलेल्या ठिकाणी नाम निर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राहील निवडणूक चिन्ह नेमणूक देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५ ला व मतदानाचा दिवस २ डिसेंबर २०२५ ला तर मतमोजणीचा दिवस ३ डिसेंबर २०२५ ला राहील शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस १० डिसेंबर २०२५ असा राहील अशी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आर्वीत २५ नगरसेवक व १ नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचा उत्साह दुगुनीत झाला असून सर्व उमेदवार पक्षाकडे आप आपली उमेदवारी पक्की करण्याच्या तयारीने कामाला लागले आहे परंतु शहरात होत असलेल्या चर्चा कोणाला तिकीट भेटणार ह्या उत्सुकता असणाऱ्या नागरिकांना मात्र कोणत्या पक्षाची तिकीट कोणाला मिळणार असे चर्चेला चांगलेच उधाण आलेले दिसत आहे.

आर्वीत तेली-कुंबी समाजाच्या समीकरणावरच ठरणार नगराध्यक्ष

सत्ताधारी पक्ष व तुल्यबळ पक्ष यातून गोपनीय चर्चेतून सध्या तरी सत्ताधारी पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी २ महिला उमेदवारांचे नाव अतिचर्चित असल्याची चौका चौकात शहरात चर्चा होत आहे. तर दुसरीकडे तुल्यबळ पक्षाकडून १ नाव आर्वी शहरात सर्वांना परिचित असणार स्वच्छ प्रतिमा असणाऱे माजी नगराध्यक्ष यांच्या सुनेचे नाव गोपनीय चर्चेतून समोर आल्याचे शहरात चर्चा होत आहे. तर सत्ताधारी पक्षात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या पक्षाचं तिकीट न भेटणाऱ्या पैकी उमेदवार नाराज होऊन तुल्यबळ पक्षाकडे दिग्गज तुल्यबळ समाज उमेदवार पक्षाच्या तिकीटी करिता धाव घेतील का? ही सुद्धा चर्चा होत आहे.

veer nayak

Google Ad