आर्वीतील सिंधी समाजाने गृहमंत्र्या कडे निवेदनातून संताप जनक व्यक्तव्य करणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : जे.सी.पी. शक्ती क्रांती पार्टीचे छत्तीसगढ प्रमुखाने सोशल मिडीयावर संतापजनक सिंधी समाजाचे इष्टदेवता झुलेलाल साई यांचेबाबत संतापजनक व अपमानजनक भाषेत वक्तव्य केले. त्यामुळे सिंधी समाजाच्या भावना दुःखावल्या आहे. त्यामुळे समाजात रोष निर्माण झालेला आहे. असे वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करण्यात येत आहे हयाचा आर्वी तील संपूर्ण सिंधी समाजाने या अपमान जनक व्यक्तव्याचा निषेध केला. आणि मा. गृहमंञी यांना मा. उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देऊन दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली.
अखंड भारत असतांना आम्ही पाकीस्तानचे सरहद्दीत वास्तव्यास होतो परंतु स्वातंत्र्यानंतर आम्ही भारतात राहणे पसंत केले. आमचे भारत देशावर प्रेम असल्याने भारतात राहण्यास पसंती दिली. त्यानुसार आमचे पुनर्वसन करण्यात आले. पण असे काही विघ्नसंतोषी नेते आमचे समाजाविरूध्द उलटसुलट वक्तव्य करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात हे उचित नाही. करिता विनंती आहे की, विषयांकित जे.सी.पी. शक्ती पार्टीच्या प्रमुखास अटक करण्यात येवुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी सर्व उपस्थित सिंधी समाजाने संताप जनक वक्तव्याचा तीव्र निषेध करून अशी वक्तव्य करणाऱ्या वर प्रामुख्याने मागणी केली.


निवेदन देतेवेळी टेकचंद मोटवानी, सोनू ठाकूर,अनिल लालवानी, देविदास कोटवाणी, दिलीप कटीयारी, सवाल ठाकूर, रमेश मनशानी, कैलास मेघवानी, रूपचंद चैनानी, सुदामा मोटवानी, घनश्याम वधवा, किशोर ठाकूर, लखमीचंद करतारी, सुरेश कोटवाणी, जय मोटवानी व इत्यादी संपूर्ण सिंधी समाज प्रामुख्याने उपस्थित होते.















