धामणगाव रेल्वे
तुळजाई नगरी मंदिर परीसरात दिवाळी पहाट सुरेल संगीत मैफिलेचे आयोजन करण्यात आले दिवाळी निमित्याने सहकुटुंब पारंपरिक वेशभूषेत दिवाळी साजरी करतात तर ठिकठिकाणी सुरेल दिवाळी पहाट कार्यक्रम…आणि घरोघरी उजळलेले मांगल्याचे, आनंदाचे दीप, अशा चैतन्यपूर्ण वातावरणात दिवाळी पाडव्याचा सण (बलिप्रतिपदा) साजरा केला जातो. पाडव्यानिमित्त धामणगाव रेल्वे येथील तुळजाई नगरी येथे भवानी मंदीराकडून दिवाळी पहाट मधुर संगीत मैफीलीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. यामधे स्वरसिंधु कलामंचाचे गायक सागर ठाकरे, प्रा.सचिन घारफळकर, प्रफुल महल्ले, रवी ठाकरे, मधुकर खरकडे, बासरी वादक प्रमोद भेंडे, तबला वादन मंगेश वानखेडे, व अधीराज ठाकरे तर कार्यक्रमाचे निवेदन प्रा. सचिन घारफळकर यांनी केले. दि’आर्टिस्ट म्युझिक अकादमी व कराओके क्लबच्या गायक-कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाने शेकडो रसिकांनी आस्वाद घेतला.


यावेळी सागर ठाकरे यांनी संगीत जोपासणे व सामाजिक जीवनातील संगीताचे महत्त्व सांगून उपस्थितांना गायनाची विशेष मेजवानी दिली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष गोविंद मानकर,अरुण चव्हाण, गणेश कडगे, गुणवंत सावलकर, मंगेश राजनकर, कोल्हे साहेब, पुंडलिक मेश्राम तर परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मंदिराचे सहसचिव रवींद्र ठाकरे यांनी केले.















