चांदूर रेल्वे (प्रतिनिधी): मु.पो. शिरसगाव कोरडे (ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीबाबत ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ. संगीता राजू बद्रे होत्या.
गावातील महिलांचा, युवकांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने हा ठराव एकमताने पारित झाला. या निर्णयामुळे शिरसगाव कोरडे हे दारूमुक्त गाव म्हणून नव्या संकल्पाने पुढे जात आहे.
दारूबंदीचा हा ठराव ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने गावाने टाकलेले एक मोठे पाऊल मानले जात आहे.
“दारूमुक्त गाव – एक नवा संकल्प”
हा संकल्प आता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी सज्जतेचा निर्धार केला आहे.













