पीपल्स रिपब्लीकन पार्टी वर्धा जिल्हा बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्हा आझाद समाज पार्टी, वर्धा जिल्हा यांचे धरणे आंदोलनाद्वारे कारवाईची मागणी

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

एक दिवशीय धरणे आंदोलन यानंतर उग्र आंदोलन करण्याची भूमिका

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

 आर्वी : पंचायत समिती आर्वी अंतर्गत करोडो रूपये अपहार केल्याबाबत, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) प्रणाली कसर व संबंधित दोषी कंत्राटदार यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल अशा याचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातुन केली मागणी  

दोन महिन्यापुर्वी उघड झालेला रोजगार हमी योजना पं.स. आर्वी मध्ये महाघोटाळा उघडकीस आला. त्यानंतर २५ लाख रूपये प्रथमदर्शनी उघड झाले. ही रक्कम कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांचेकडून शासन जमा करून घेण्यात येवुन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर हिला बडतर्फ करण्यात आले. परंतु अपहार सिध्द झाला असतांना सुध्दा एफ. आय. आर. दाखल करण्यात आलेला नाही.

हा अपहार संगनमताने संगठीतपणे करण्यात आलेला आहे. गट विकास अधिकारी यांचे डी.एस.सी. प्रमाणित करून, ओटीपी दिल्याशिवाय रक्कम वळती होवु शकत नाही. डी.एस.सी. प्रमाणित करण्याची जबाबदारी ही गटविकास अधिकाऱ्याची आहे. लाखो रूपये दुसऱ्या खात्यावर डि.एस.सी. प्रमाणित करून रक्कम वळती केलेली असल्यामुळे प्रामुख्याने गटविकास अधिकारी हया जबाबदार आहेत.

 

त्याचप्रमाणे लाखो रूपये कंत्राटदार यांचे खात्यावर सुध्दा वळती केल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळ हा अपहार संघटीतपणे संगनमताने केल्याचे सिध्द होते. त्यामुळे अपहार करणाऱ्यांवर महाराष्ट्र संगठीत गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे. अपहार करणाऱ्यांची अमरावती, धामणगाव, वर्धा, नागपूर या ठिकाणी बँक खाती असल्याची चर्चा असून काही रकमा आप्तस्वकीयांच्या बँक खात्यावर वळती केले असल्याने अपहार पूर्णपणे उघड होऊ शकत नाही संबधितांनवर तात्काळ गुन्हे दाखल करून चौकशी करण्यात यावी अशी निवेदनातून मागणी केली निवेदन देतेवेळी मेघराज डोंगरे, मनोज माहुरे, रूपचंद टोपले, बंडू पाचोळे, भीमराव धनगर, महेंद्र चतुर, प्रवीण ठाणके, प्रवीण मनवर, विनोद पायले, नाना हेरोडे, सुनील देशमुख, उमेश ढोणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad