0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तळेगाव दशासर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे कधीच न आटणारा असा संस्काराचा झरा आहे संघाच्या माध्यमाने समाजाला संस्कार संस्कृती ज्ञान चरित्र एकता राष्ट्रीयता, राष्ट्रशक्ती, राष्ट्रभक्ती, आचार, विचार, हे सर्व गुण आत्मसात होतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दैनंदिन शाखा म्हणजे संस्कार शाळा आहे भारताला परमवैभव प्राप्त व्हावे आणि भारत विश्व गुरु पदी आरुढ होवोत याच उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद पासून तर राष्ट्रकरिता बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याच उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य मागील शंभर वर्षांपासून अविरत चालू आहे भारताला परम वैभव प्राप्त व्हावे हा स्पष्ट उद्देश संघाचा असल्यामुळे संघ मागील शंभर वर्षांपासून टिकून आहे आणि आपली शताब्दी साजरी करतो आहे 

आम्ही जिंकलो, जिंकू आणि जिंकतच राहू त्यामुळे पराजयाचा विचार कधी येऊ नये याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्री विजयादशमी उत्सव खूप उत्साहात साजरा करीत असतो असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागण विभागाचे कमल छांगाणी यांनी व्यक्त केले ते तळेगाव दशासर येथे श्री विजयादशमी उत्साहात बोलत होते 

 या प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून तळेगाव येथील प्रसिद्ध पत्रकार भाऊराव मारोतराव इंगोले तर प्रमुख वक्ते म्हणून धर्म जागरण प्रांत सह निधी प्रमुख कमल छांगाणी व तालुका कार्यवाह विशाल मोकाशे उपस्थित होते. 

छांगाणी पुढे म्हणाले की, हिंदू हा शब्द जात पात पंथ नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक राष्ट्रभक्ताला हिंदू म्हणून संबोधतो हिंदू हा शब्द जो व्यक्ती भारत माता की जय, जिऊंगा तो भारत के लिये मारुंगा तो भारत के लिये, भारत माझा मी भारताचा या उद्देशाने जीवन जगतो आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे 

यावेळी छांगाणी यांनी संघाच्या पंचपरिवर्तन बाबत सविस्तर विश्लेषण केले. यावेळी शस्त्रपूजन सुद्धा करण्यात आले तसेच शारीरिक प्रात्यक्षिक घोष व सांघिक व्यायाम योग स्वयंसेवकांनी सादर केले. 

प्रमुख अतिथी पत्रकार भाऊरावजी इंगोले म्हणाले की,संघांचे स्वयंसेवक अतिशय शिस्त बद्ध असतात, कार्यक्रम सुंदर पद्धतीने कार्य करतात हे कौतुकास्पद आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार तालुका कार्यवाह विशाल मोकाशे यांनी केले. सांघिक गीत विनय चौधरी, सुभाषित विशाल तिरमारे, अमृतवचन अमर वेळूकार, तसेच वैयक्तिक गीत अमर सुरजुसे यांनी सादर केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत तळेगाव व परिसरातील नागरिक, महिला तरुण उपस्थित होते.

उल्लेखनीय पथसंचलन …..

श्री विजयादशमी उत्सवापूर्वी तळेगावात स्वयंसेवकांचे घोष सह उल्लेखनीय पथसंचलन निघाले संपूर्ण तळेगाव रांगोळ्यांनी सजवलेले होते पथसंचलनाचे ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले

उद्बोधन करताना कमल छांगाणी 

 मंचावर पत्रकार इंगोले व तालुका कार्यवाह प्रा.विशाल मोकाशे

veer nayak

Google Ad