धामणगाव तालुका CAIT फेडरेशन नियुक्तीबद्दल भव्य सत्कार

0
20
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :

अखिल भारतीय व्यापारी परिसंघ (CAIT) फेडरेशनच्या धामणगाव तालुका पदावर झालेल्या निवडीबद्दल आज शहरात आनंदाचे वातावरण दिसून आले. या निमित्ताने सार्वजनिक नवदुर्गा उत्सव समिती तसेच स्वर्णकार सराफा संघटना, धामणगाव यांच्या वतीने श्री. संजयजी जागडा यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी मान्यवरांनी श्री. जागडा यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

व्यापारी बांधव व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिनंदन केले.

नव्या जबाबदारीबद्दल संजयजी जागडा यांनी संघटनाच्या विश्वासाला पात्र ठरून व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचे आश्वासन दिले.

या सोहळ्याने संपूर्ण व्यापारी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

“श्री. संजयजी जागडा यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा…!”

veer nayak

Google Ad