धामणगाव रेल्वे शेतकरीहितासाठी कार्यरत असलेल्या धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी 11.३० वाजता आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते झाला.
या प्रसंगी समितीचे सभापती सौ कविता ताई श्रीकांत गावंडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखेडे यांच्यासह बाजार समितीचे संचालक राधेश्याम चांडक, प्रमोद राठोड, मंगेश बोवडे, देवरावजी बमनोते, संदीप दावेदार दिनेश जगताप, मुकुंद माहोरे, प्रशांत हुडे, गिरीश भुताडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
आमदार विरेंद्रभाऊ जगताप या प्रसंगी म्हणाले की “शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, त्यांना योग्य भाव मिळावा, हीच आमची धडपड आहे. सरकारकडून मदत मिळवण्यासाठी आमचे सतत प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना शासना कडून मदत मिळाली नाही तर काळी दिवाळी करू शेतकऱ्यांना मदत मिळायलाच पाहिजे असे बोलत होते
या कार्यक्रमात शेतकरी बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी सरकसपूर गाविंद कडू यांच्या सोयाबीनला ₹4551, गजानन गवई यांना ₹4421 तसेच मालखेड चे पृथ्वीराज देशमुख यांच्या सोयाबीनला ₹4421 असा शुभारंभा प्रसंगी भाव मिळाला.
या सोहळ्याला प्रशांत साबाने, चंदु दाहाणे, सुनील भोगे, मंगेश कडू, अविनाश इंगळे, संजय धामधे, जयंत ठाकरे, संजय गाडे, संतोष पलसापूर, व्यापारी संजय अग्रवाल, मनीष केला, प्रदीप कुचेरिया, सचिन गंगण, प्रेमकुमार टावरी, राजेश गंगण, मनीष भट्टर, शैलेश वसाणी, तेजस दुबे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.
तसेच असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जयस्वाल, पवन लाहोटी, कैलास राठी, प्रदीप राठी, रितेश राठी, प्रमोद मुघडा, राजेंद्र पनपलिया, महेश गंगण, दीपक राजनकर, संतोष राजनकर, देवदत्त कापसे, आशिष कापसे, आनंद कांकोरिया, सचिन राठी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव प्रवीण साहेबराव वानखेडे यांनी केले. शेवटी शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल थेट बाजार समिती आवारात आणून विक्री करावा, असे आवाहन करण्यात आले.